WEFचा ‘वैश्विक धोका अहवाल 2019’

0
232

बोर्ज ब्रेन्डे (अध्यक्ष) यांच्या नेतृत्वात असलेल्या जागतिक आर्थिक मंच (WEF) कडून ‘वैश्विक धोका अहवाल 2019’ (Global Risk Report) प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मानवी समाजापुढे असलेल्या आव्हानांची आणि मुख्य धोक्यांची ओळख पट‍वून देणार्‍या या अहवालात वैश्विक धोके कमी करण्यासाठी कमकुवत आंतरराष्ट्रीय सहकार्य हे धोकादायक ठरत असून, त्याचा सामूहिक इच्छाशक्तीवर नकारात्मक प्रभाव पडत आहे, असे दिसून आले आहे.

2018 साली जगाला जटिल आणि एकमेकांशी जुळलेल्या वाढत्या आव्हानांचा सामना करावा लागला. हवामान-विषयक बदल आणि घटलेली जागतिक वाढ ते आर्थिक असमानता अश्या समस्यांना कमी करण्यास जग अपयशी ठरत आहे. आणि याचे परिणाम भविष्यात सर्वांना भोगावे लागणार, असा इशारा देखील दिला गेला आहे. अश्या परिस्थितीचे निराकरण न झाल्यास, चौथ्या औद्योगिक क्रांतीमधील वाढत्या अडथळ्यांमध्ये अधिकच वाढ होणार.

इतर ठळक बाबी

सामूहिकपणे संकटाला सामोरे जाण्याऐवजी जगात जोरदार राज-केंद्रित राजकारणाचा एक नवीन टप्पा आकार घेत आहे. वाढते भौगोलिक-राजकीय आणि भौगोलिक-आर्थिक तणाव हा 2019 सालचा सर्वात गंभीर आणि महत्त्वाचा धोका आहे, असे 90% तज्ञांचे मत आहे.

शिवाय पर्यावरण-विषयक हानी हा एक दीर्घकालीन धोका आहे आणि 2019 सालच्या पाच सर्वात प्रभावशाली जागतिक धोक्यांमधील चार तर हवामानाशी संबंधित आहेत.

बदलत्या आणि तणावपूर्ण भौगोलिक आणि मानवी जीवनामुळे बरेच लोक विचलित, दुःखी आणि एकट्याने जगत आहेत, ज्यामुळे त्यांच्यात राग वाढत आहे आणि असंवेदनशील होत आहेत.

2018 साली मॅक्रोइकनॉमिक धोक्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले गेले होते. यादरम्यान आर्थिक बाजारातील अस्थिरता वाढली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) अंदाजानुसार जागतिक वाढीचा दर सर्वात जास्त उंचावला असल्याचे दिसते, मात्र पुढील काही वर्षांमध्ये हा वृद्धीदर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. चीन सारख्या प्रगत अर्थव्यवस्थांमधील मंदीचा हा परिणाम आहे.

वैश्विक कर्जाचा भार हा देखील खूप महत्त्वाचा परिणामकारक घटक आहे. सद्यस्थितीत जागतिक कर्ज हे जागतिक GDPच्या 225% एवढ्या प्रमाणात आहे.

हवामानात होणार्‍या बदलांचा जैवविविधतेला सर्वात मोठा फटका बसलेला आहे. 1970 सालापासून जगभरात आढळून येणार्‍या एकूण प्रजातींच्या संख्येत 60% घट झाल्याचे दिसून आले आहे, जे मानवी जीवनावर देखील आरोग्य आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्‍या परिणाम करीत आहे.

वेगाने विकसित होणारे सायबर आणि तांत्रिक धोके हे सर्वात धोकादायक अडथळे आहे, जे मानवी समाजाला एकसंध करण्याच्या प्रयत्नांना अडथळा ठरत आहे. जागतिक धोक्यांमध्ये तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. डिजिटल माहितीमध्ये फसवणूक आणि सायबर हल्ला, फसव्या बातम्या आणि ओळख चोरी अश्या घटना वाढलेल्या आहेत.

जगभरात लोकांमध्ये मानसिक आरोग्य-विषयक समस्या वाढलेल्या आहेत. जगभरात अंदाजे 700 दशलक्ष लोक मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत. शिवाय जैविक रोगजनकांशी संबंधित रोगांमध्ये वाढ झाली आहे. स्वाइन फ्ल्यू सारख्या विविध रोगांचा कालांतराने उद्रेक होत आहे.

वाढत्या वैश्विक तापमानामुळे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळत आहे, परिणामी समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. 2050 सालापर्यंत जागतिक लोकसंख्येपैकी दोन-तृतियांश लोक शहरात राहणार असण्याचा अंदाज आहे आणि आज 570 तटीय शहरांमध्ये 800 दशलक्ष लोक राहतात, जेव्हा की 2050 सालापर्यंत समुद्र-पातळीत 0.5 मीटरची वाढ होण्याचा अंदाज आहे.