RCB च्या प्रशिक्षकपदी गॅरी कस्टर्न यांची नियुक्ती

0
208

आयपीएलमध्ये विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या प्रशिक्षकरदी, दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज गॅरी कस्टर्न यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. गेली अनेक वर्ष न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनिअल व्हिटोरी संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळत होता, मात्र गेल्या काही हंगामात RCB ला अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने कस्टर्न यांच्या खांद्यावर प्रशिक्षणाची धुरा देण्याचा निर्णय घेतला आहे.

२०११ साली भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचे कस्टर्न प्रशिक्षक होते. याचसोबत अकराव्या हंगामात कस्टर्न यांनी RCB च्या फलंदाजी प्रशिक्षकाचं काम पाहिलं होतं. कस्टर्न यांच्या मार्गदर्शनाखाली RCB चा संघ चांगली कामगिरी करेल असा आत्मविश्वास संघ व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. आगामी काळात RCB ला विजेतेपद मिळवून देण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन असा विश्वास कस्टर्न यांनी व्यक्त केला आहे.