PM मोदी करणार ‘मैं नहीं हम’ अॅप लाॅंच

0
244

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मैं नहीं हम’ पोर्टल आणि अॅप लाॅंच करणार आहे. यावेळी मोदी हे आईटी आणि इलेक्‍ट्रॉनिक वस्तुनिर्माण करणाऱ्या उद्योजकांशी संवाद साधणार आहे. आज देशातील शंभरहून जास्त ठिकाणातील आईटी आणि इलेक्‍ट्रॉनिक वस्तु निर्माण करणारे उद्योजक वीडियो कॉन्फ्रेसच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले जाणार आहे.

दिल्लीतील नेहरू स्टेडियममध्ये एक लाख आयटी प्रोफेशनलशी पंतप्रधान मोदी प्रश्न उत्तराच्या स्वरूपात संवाद साधतील. या कार्यक्रमा बाबत डिजिटल इंडिया या अधिकृत ट्विटर खात्यावरून माहिती देण्यात आली आहे.

‘मैं नहीं हम’ पोर्टल आणि अॅप लाॅंच करण्याच्या मुख्य हेतू म्हणजे आयटी क्षेत्राशी आपले नाते अधिक घट्ट होऊन त्यांनी समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे. या माध्यमातून आयटी व्यावसायिकांनी आपण केलेली सामाजिक कामे इतरांपर्यंत पोहोचवू शकतील. आयटी व्यावसायिकांनी समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, म्हणून ‘सेल्फ फॉर सोसायटी’ कार्यक्रमाची संकल्पना मांडली आणि यातून ‘मैं नहीं हम’ संदेश देण्यात येत आहेत.