NASSCOM चे नवे अध्यक्ष – देबजानी घोष

0
32

इंटेल (दक्षिण एशिया) चे माजी व्यवस्थापकीय संचालक देबजानी घोष यांची राष्ट्रीय सॉफ्टवेयर व सेवा कंपनी संघ (NASSCOM) चे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

# इंटेल (दक्षिण एशिया) चे माजी व्यवस्थापकीय संचालक देबजानी घोष यांची राष्ट्रीय सॉफ्टवेयर व सेवा कंपनी संघ (NASSCOM) चे अध्यक्ष (प्रेसिडेंट पदी) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

# देबजानी घोष यांची नियुक्ती आर. चंद्रशेखर यांच्या जागी करण्यात आली आहे.

# त्यांचा या पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे.

# कॉरपोरेट भारतात देबजानी घोष या इंटेल इंडिया व MAIT (मॅनुफॅक्चर्स असोसिएशन फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी) यांच्या प्रथम स्त्री प्रमुख होत्या.

NASSCOM – (National Association of Software and Services Companies) :

राष्ट्रीय सॉफ्टवेयर व सेवा कंपनी संघ (National Association of Software and Services Companies –NASSCOM) हे भारतीय माहिती तंत्रज्ञान (IT) आणि बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (BPO) उद्योगाची व्यापार संघटना आहे. याची सन 1988 मध्ये स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. NASSCOM ही एक जागतिक व्यापार संघटना आहे, ज्याचे जगभरात 2000 हून अधिक सदस्य आहेत. NASSCOM चे वर्तमान अध्यक्ष (चेअरमन) रमन रॉय हे आहेत.