IREDA आणि युरोपीय गुंतवणूक बँक यांच्यात कर्ज करार

0
19

अक्षय ऊर्जा क्षेत्रात वित्त पुरवठा करणारी जगातली सर्वात मोठी संस्था युरोपीय गुंतवणूक बँक (EIB) याने नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीत भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था (IREDA) याला 150 दशलक्ष (15 कोटी) युरो (जवळजवळ 12 अब्ज रुपये) चे दीर्घकालिक कर्ज देण्यासाठी करार केला आहे.

# अक्षय ऊर्जा क्षेत्रात वित्त पुरवठा करणारी जगातली सर्वात मोठी संस्था युरोपीय गुंतवणूक बँक (EIB) याने नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीत भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था (IREDA) याला 150 दशलक्ष (15 कोटी) युरो (जवळजवळ 12 अब्ज रुपये) चे दीर्घकालिक कर्ज देण्यासाठी करार केला आहे.

# पतमर्यादेचा कालावधी 15 वर्षांचा आहे. हा निधी भारतात अक्षय ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमतेच्या प्रकल्पांसाठी खर्च केला जाणार आहे.

# या निधीतून तयार होणाऱ्या स्वच्छ उर्जा निर्मितीपासून 1.1 दशलक्षांपेक्षा जास्त घरांना लाभ मिळण्याचे अपेक्षित आहे.

भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था (IREDA) :

ही एक मिनीरत्न (श्रेणी-I) भारत सरकार उपक्रम आहे, जे केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली आहे. IREDA ही 1987 साली स्थापित करण्यात आलेली बिगर-बँकिंग वित्तीय संस्था म्हणून असलेली एक सार्वजनिक मर्यादित शासकीय कंपनी आहे, जी अक्षय ऊर्जा प्रकल्पाचा विकास, त्यासाठी वित्तपुरवठा आणि प्रोत्साहन देते.