IGIB संशोधकाना सूक्ष्मजीवांविरूद्ध काम करणारा नवा जीव

0
25

त्वचेवर आढडणारा स्टॅफिलोकोकस कॅपिटिस नावाचा एक असा जीवाणू जो सूक्ष्मजीवांविरूद्ध त्यांच्या कार्यांना प्रतिबंध करण्याचा कार्य करतो. दिल्लीच्या CSIR – इंस्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (CSIR-IGIB) येथील डॉ. भूपेश तनेजा आणि डॉ. शर्मा नेतृत्वाखाली हा शोध झाला आहे.
स्टॅफिलोकोकस कॅपिटिस हा जीवाणू स्टॅफिलोकोकस ऑरियस यासोबतच ग्राम-पॉझिटिव्ह जीवाणू विरूद्ध लढण्यास मजबूत प्रतिजैविक क्रिया प्रदर्शित करत आहे.

या अभ्यासाचे निष्कर्ष सायंटिफिक रिपोर्ट या मासिकेत प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

स्टॅफिलोकोकस कॅपिटिस

स्टॅफिलोकोकस कॅपिटिस हा जीवाणू एखाद्या निरोगी मानवी पावलावरील त्वचेच्या पृष्ठभागापासून मिळवलेला आहे. हा जीवाणू विशेषत पायांच्या बोटांजवळ आढळतो. विविध जावाणू त्वचेच्या वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात. 

ह्या संशोधनाचे महत्व काय आहे ?

या संशोधनामुळे नवीन प्रतिजैविक संयुगे विकसित करण्याकरिता एक नवी संकल्पना मांडली गेली आहे. जगभरता त्वचेवर आढळणार्या जीवाणूला सूक्ष्मजीवविरोधी असल्यासंबंधी पुष्टी मिळते. 

या संशोधनाचे पुढिल पाउल म्हणजे या जीवाणूची भूमिका ओळखणे आणि औषधी स्वरूपात वापर करण्यासाठी त्यांचे प्रमाण ओळखणे आणि त्या संबंधी वैद्यकीय पद्धती शोधणे असे आहे.