ICC T-20 क्रमवारीत भारत 5 व्या स्थानावर घसरला

0
14

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 3 मे, 2019 रोजी ICC पुरुष T-20 संघाची क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीनुसार, भारत तीन स्थानांनी घसरून पाचव्या स्थानावर आला आहे.

• 2009 मध्ये ICC T-20 विश्वचषक विजेता पाकिस्तानने 286 गुणांसह पुरुष T-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत सर्वोच्च स्थान पटकावले आहे.
• या क्रमवारीत अव्वल पाच स्थानांवर दक्षिण आफ्रिका (262), इंग्लंड (261), ऑस्ट्रेलिया (261) आणि भारत (260) यांचा समावेश आहे.
• अफगाणिस्तान आणि श्रीलंका प्रत्येकी एक स्थान वर येऊन 7 व्या आणि 8 व्या स्थानावर आले आहेत.

पुरुषांची T-20 टीम क्रमवारी :

1 – पाकिस्तान – रेटिंग (286)
2 – दक्षिण आफ्रिका – 262
3 – इंग्लंड – 261
4 – ऑस्ट्रेलिया – 261
5 – भारत – 260
6 – न्युझीलँड – 254
7 – अफगाणिस्तान – 241
8 – श्रीलंका – 227
9 – वेस्टइंडीज – 226
10 – बांगलादेश – 220

• ICC क्रिकेट विश्वचषक 2019च्या काही दिवसांपूर्वीच ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे, जे 30 मे, 2019 पासून इंग्लंड व वेल्समध्ये सुरू होणार आहे.