GSAT-6A दळणवळण उपग्रह अवकाशात

0
28

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) कडून 29 मार्च 2018 रोजी आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरुन स्वदेशी बनावटीच्या ‘GSAT-6A’ या दळणवळण उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे.

वैशिष्ट्ये :

# GSAT-6A या उपग्रहाची आयुर्मर्यादा 10 वर्षांची ठरविण्यात आली आहे.

# हा एक उच्च-शक्ती एस-बॅंड तंत्र आधारित संपर्क उपग्रह आहे. 

# GSAT-6A हा उपग्रह 6 मीटर आकाराचा एस-बॅंड अनफर्लेबल अॅंटीना, पृथ्वीवरील केंद्र आणि नेटवर्क व्यवस्थापन तंत्रज्ञानाने सुसज्जित आहे.

# हा उपग्रह मोबाइल संपर्काच्या क्षेत्रात उपयोगात आणला जाणार आहे.

# GSAT-6 शृंखलेतला हा दुसरा उपग्रह आहे. यापूर्वी ऑगस्ट 2015 मध्ये GSAT-6 अवकाशात सोडले गेले होते. GSAT-6A हा GSAT-6 ला जोड म्हणून कार्य करणार.

उपग्रहाचे फायदे : 

GSAT-6 उपग्रह भारतात कुठेही उपग्रह आधारित मोबाइल कॉलिंग आणि संपर्क सुलभ बनविण्यास मदत करणार. याचा सर्वाधिक फायदा दुर्गम भागात लष्करी संपर्कात होऊ शकणार. तसेच उपग्रहात सी-बॅंड संपर्कासाठी एक 0.8 मीटर लांबीचा अँटीना बसविण्यात आला आहे, जो पारंपारिक संपर्क उपकरणांची क्षमता वाढविणार.एस-बॅंड हे एक विद्युतचुंबकीय लहरींच्या वारंवारीतेमधील एक भाग आहे, ज्यामध्ये 2 GHz ते 4 GHz (गीगाहर्त्झ) यादरम्यान वारंवारिता (frequency) समाविष्ट आहेत. हे मुख्यत: हवामानाशी संबंधित रडार, जहाजावरील रडार आणि काही दळणवळण उपग्रहांमध्ये वापरले जाते, जेथे भक्कम आणि अखंड संपर्क सेवा अपेक्षित असते. हे 4G सेवेसाठी लागणार्‍या 2.5 GHz बँडसाठी तसेच मोबाइल ब्रॉडबँड सेवेसाठी अतिशय उपयुक्त आहे. 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)

ISRO ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे. याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे. 1962 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे, 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापित ISRO ने 1962 साली स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) ला बदलले.