BCCIने वयाच्या फसवणूकीसाठी दोन वर्षाची बंदी जाहीर केली

0
194

27 नोव्हेंबर 2018 रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केले की वयासंदर्भात फसवणूकीच्या दोषी खेळाडूंना दोन वर्षांच्या कालावधीसाठी त्याच्या मान्यताप्राप्त स्पर्धांमधून प्रतिबंधित केले जाईल.

क्रिकेट बोर्डाच्या निवेदनात म्हटले आहे, “BCCIच्या क्रिकेट टूर्नामेंटसाठी नोंदणी करताना आपली जन्मतारीख बदलणाऱ्या खेळाडूविरुद्ध नेहमीच कठोर कारवाई करण्यात आली आहे.”

महत्वाचे मुद्दे

• BCCIच्या दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, 2018-19 पासून आपल्या जन्मतारीखची छेडछाड करणारा कोणताही क्रिकेटपटू अयोग्य ठरविला जाईल आणि कोणत्याही बीसीसीआय स्पर्धेत दोन वर्षे म्हणजे 2018-19 आणि 2019-20 या कालावधीसाठी सर्व स्पर्धेत भाग घेण्यापासून प्रतिबंध केला जाईल.
• नवीन नियमांनुसार बोर्ड त्यांच्या जन्मतारखेच्या प्रमाणपत्रांशी छेडछाड करणार्या क्रिकेटपटूंवर हि कार्यवाही करेल.
• आधीच्या नियमांनुसार, अश्या फसवणूकीच्या दोषी खेळाडूला एक वर्षाच्या कालावधीसाठी बंदी घालण्यात येत होती.
• सप्टेंबर 2018 मध्ये BCCIने मेघालयातील दिल्ली खेळाडू, जसकिरत सिंह सचदेव ह्याला अंडर-19 टूर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी बनावटी जन्म प्रमाणपत्र तयार करण्याबद्दल बंदी घातली होती.

पार्श्वभूमी

• वयाची फसवणूक ही समस्या बऱ्याच काळापासून अस्तित्वात आहे आणि हे केवळ भारतीय संघ किंवा क्रिकेटच्या क्रीडापुरते मर्यादित नाही.
• भारतात, जूनियर क्रिकेट किंवा अंडर-19 संघात हा एक मोठा मुद्दा आहे.
• 2015 मध्ये MAK पटौडी व्याख्यानात माजी भारतीय कर्णधार आणि भारत-A संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारतीय क्रिकेटमधील एक मोठी समस्या म्हणून वयाची फसवणूक हे असल्याचे मान्य केले होते आणि BCCI च्या निर्णयाचे स्वागत केले की U-19 वर्ल्डकपमध्ये कोणत्याही खेळाडूला केवळ एकदाच ही स्पर्धा खेळण्यास मंजुरी द्यावी.