91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

0
25

91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा विदर्भाच्या प्रवेशद्वारावरील बुलढाण्यात होणार आहे. त्यामुळे विदर्भात आता सारस्वतांचा मेळा भरणार आहे.

यंदाच्या मराठी साहित्य संमेलनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे संमेलनाच्या स्थळाच्या एकूण तीन अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये दिल्ली, गुजरात मधील प्रत्येकी एका ठिकाणचा समावेश असून महाराष्ट्रातून सुद्धा केवळ एकच अर्ज प्राप्त झाला आहे.  तो अर्ज बुलढाणा जिल्ह्याच्या हिवराश्रम येथून करण्यात आला आहे. त्यामुळे महामंडळाने नियुक्त केलेली स्थळ निवड समितीने या तिन्ही ठिकणांना भेट दिली आहे. यातील तिसरी भेट यांनी बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा येथील विवेकानंद आश्रमाला दिली आहे. त्यामुळे सर्व क्षमता असणाऱ्या ठिकाणची निवड आता होणार असून सर्व साहित्यिकांसह साहित्य प्रेमींच्या नजरा स्थळ निवड समितीच्या निर्णयाकडे लागल्या होत्या. हिवरा आश्रमाला या वर्षीचा यजमानपदाचा मान  मिळाला आहे. यजमानपदावर एकमत न झाल्याने आज मतदान घेण्यात आले यामध्ये 5 विरुद्ध 1 मताने हिवरा आश्रमवर शिक्का मोर्तब करण्यात आला.

इतिहास 

1865 साली न्या.रानडे यांनी मराठीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा आढावा घेतलेला दिसतो. त्यानुसार 431 गद्य आणि 230 पद्य पुस्तकांची निर्मिती झाल्याचे दिसते. ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या. रानड्यांनी कहितvadinchya  सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञान प्रकाश (फेब्रुवारी 7 1878) मधे प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार मे 11 1878 रोजी सायंकाळी पुण्याच्या हिरेबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. या संमेलनाचे अध्यक्ष पद न्या.रानडे यांनीच भूषविले. 90 वे साहित्य संमेलन हे डोंबिवली येथे भरले होते.