48 लोकांना जीवन रक्षक पदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

0
336

25 जानेवारी 2018 रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी 48 लोकांसाठी जीवन रक्षा पदक पुरस्कार मालिका 2018 ची मंजुरी दिली. यात 8 लोकांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर केले आहेत.

• व्यक्तींचे जीवन वाचवण्यासाठी केलेल्या अतुलनीय कार्यासाठी जीवन रक्षा पुरस्कार मालिका प्रदान केली जाते. हे पुरस्कार तीन श्रेणी अंतर्गत दिले जातात : सर्वोतम जीवन रक्षा पदक, उत्तम जीवन रक्षा पदक आणि जीवन रक्षा पदक. कोणत्याही तबक्यातील लोक या पुरस्कारांसाठी पात्र आहेत.

• यावर्षी सर्वोतम जीवन रक्षा पदक 8 लोकांना देण्यात आला असून उत्तम जीवन रक्षा पदक 15 आणि जीवन रक्षा पदक 25 लोकांना जाहीर झाला आहे. यापैकी 8 पुरस्कार मरणोपरांत देण्यात आले आहेत.

• पुरस्कारात एक पदक आणि केंद्रीय गृहमंत्रींनी स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र आणि आर्थिक भत्ता समाविष्ट आहे. हे पुरस्कार, विजेत्यास संबंधित केंद्रीय मंत्रालये, संघटना आणि राज्य सरकारद्वारे सादर केले जातात.

सर्वोतम जीवन रक्षा पदक :
• किशोर राय (मरणोत्तर) – छत्तीसगड
• चेतन कुमार निषाद (मरणोपरांत) – छत्तीसगड
• कौस्तुभ भगवान तर्मले (मरणोत्तर) – महाराष्ट्र
• प्रथमेश विजय वाडकर (मरणोत्तर) – महाराष्ट्र
• पी. लालवनपुई (मरणोत्तर) – मिझोरम
आणि इतर..

उत्तम जीवन रक्षा पदक :
• विस्मय पी – केरळ
• साजिद खान – मध्य प्रदेश
• चरणजीत सिंह बलवीर सिंह सलूजा – महाराष्ट्र
• अमोल सरजेराव लोहार – महाराष्ट्र
• लालीयनसंगा – मिझोरम
आणि इतर…

जीवन रक्षा पदक :
• अब्राहम तैयिंग – अरुणाचल प्रदेश
• पडी पयांग – अरुणाचल प्रदेश
• मोनुज चटवाल – आसाम
• राजू गढ – आसाम
• राधाकृष्णन एम – केरळ
आणि इतर…