24 तास वीज पुरवठ्यासाठी मोदींची ‘सौभाग्य योजना’

0
34

देशातील नागरिकांना 24 तास वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबरला नवीन ‘सौभाग्य योजना’ सुरु करणार आहेत.

‘सौभाग्य योजना’

आरआरएसचे जेष्ठ नेते आणि जनसंघाचे संस्थापक सदस्य दीनदयाळ उपाध्यय यांच्या जयंतीनिमित्त 25 सप्टेंबरला ही योजना सुरु केली जाणार आहे.

या योजनेअंतर्गत डिसेंबरपर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहचविण्यासाठी उपक्रम सुरु केला जाईल. या अंतर्गत ट्रांसफॉर्मर्स, मीटर्स आणि तारांसाठी सबसिडी दिली जाईल. 

सरकारने सर्व गावांमध्ये वीज पोहचविण्यासाठी जोराने काम सुरु केले आहे आणि सर्वाना 2019 पर्यंत 24 तास वीज उपलब्ध करून देण्याचे टार्गेट केले आहे.