2050 पर्यंत जगातील पहिली कार्बन तटस्थ अर्थव्यवस्था बनण्याचा हेतू : युरोपियन युनियन

0
219

28 नोव्हेंबर 2018 रोजी युरोपियन युनियनने आपल्या सर्व सरकार, व्यवसाय, नागरिक आणि क्षेत्रांना उत्सर्जन कमी करून 2050 पर्यंत आपला संघ कार्बन तटस्थ बनविण्याच्या महत्वाकांक्षी योजनेत सामील होण्यासाठी विनंती केली.

ब्रुसेल्सच्या एका पत्रकार परिषदेत EU हवामान आयुक्त मिगुएल एरियास कॅनेटे यांनी सांगितले की, आपला संघ युरोपची ऊर्जा आणि हवामान धोरण आतापासून 2050 यादरम्यान कसे विकसित होईल हे निर्धारित करण्यासाठी एक प्रक्रिया आखत आहे.
जर युरोपने आपले वर्तमान लक्ष्य चालू ठेवले तर मध्य-शतकापर्यंत आपले कार्बन उत्सर्जन मात्र 60% ने कमी होईल जे 2015 च्या पॅरिस हवामान करारानुसार युनियनची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाही.

ठळक वैशिष्ट्ये

• युरोपियन युनियनमध्ये 28 सदस्य आहेत, जे एकत्रितपणे जगातील सर्वात मोठ्या आणि म्हणूनच प्रदूषण करणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहेत. म्हणूनच, एक उदाहरण स्थापित करण्यासाठी कार्बन तटस्थ बनून प्रथम प्रमुख जागतिक खेळाडू बनण्यास उत्सुक आहेत.
• युरोपियन युनियनची रणनीतिक दीर्घकालीन दृष्टी आपल्या सदस्य देशांच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे.
• हवामान तटस्थ उद्दिष्टाखाली, सदस्य देश 2018 च्या अखेरीस राष्ट्रीय ऊर्जा योजना EUकडे सादर करतील.
• EUच्या हवामान आयुक्तानुसार, मुख्यत्वे वाहतूक आधुनिकीकरण केले जाईल आणि कोणत्याही यशस्वी धोरणाचा मुख्य मुद्दा 2050 पर्यंत उर्जेच्या उत्पादनात जीवाश्म इंधनाचा वापर 80 टक्क्यांनी कमी करणे हा असेल.
• युरोपच्या जीडीपीच्या दोन टक्क्यांवरून 2.8 टक्के ते स्वच्छ ऊर्जामध्ये गुंतवणूकीत वाढ होईल, जे प्रति वर्ष 175 ते 290 बिलियन युरो इतके असेल.
• आगामी COP24 हवामान परिषदेसाठी पोलंडमध्ये 200 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी येणार असण्याच्या आधी ही घोषणा करण्यात आली आहे. COP24 चा उद्देश पॅरिस करारवर नूतनीकरण आणि ग्लोबल वार्मिंग मर्यादित करणे आहे.