2019 च्या सुरुवातीपासून चीनला कच्च्या साखरेची निर्यात पुन्हा सुरु करणार भारत

0
209

2019 पासून चीनला कच्च्या साखरेच्या निर्यातीची एक दशकानंतर पुन्हा सुरू करण्याची योजना आहे. अतिरिक्त साठ्यामुळे घटणाऱ्या किमती स्थिर करण्यासाठी आणि त्यामुळे भारतीय साखर कारखान्यांमध्ये निर्माण झालेले आर्थिक संकट कमी करण्यासाठी विदेशी बाजारपेठेकडे लक्ष केंद्रित करण्याच्या हेतूने हे पाऊल उचलण्याचे मोठे
उद्दिष्ट आहे.

वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने एका वक्तव्यात म्हटले आहे की, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन आणि चीनची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी COFCO ने 15 हजार टन कच्ची साखर निर्यात करण्यासाठी करार केला आहे.

ठळक वैशिष्ट्ये
• पुढच्या वर्षीपासून चीनला दोन दशलक्ष टन कच्ची साखर निर्यात करण्याची भारतची योजना आहे.
• भारतातून चीनममध्ये आयात होणाऱ्या नॉन-बासमती तांदूळानंतर कच्ची साखर हे दुसरे उत्पादन आहे.
• याने चीनने भारतासोबत असलेल्या 60 अब्ज व्यापार तूट कमी होण्याची अपेक्षा आहे.
• 2017-18 मध्ये चीनला भारताने 33 अब्ज अमेरिकी डॉलर्सइतकी निर्यात केली होती तर आयात 76.2 बिलियन डॉलर्स इतकी होती.

पार्श्वभूमी
• 2017-18 विपणन वर्षामध्ये भारताने 32.5 दशलक्ष टन साखरेची निर्मिती केली आणि चालू विपणन वर्षामध्ये ही पातळी समान पातळी किंवा किंचित कमी असल्याचे अनुमान आहे.
• वार्षिक घरगुती मागणी सुमारे 26 दशलक्ष टन आहे. गेल्या महिन्यात सुरू झालेल्या चालू विपणन वर्षाच्या सुरूवातीला देशाने 10 दशलक्ष टनांने प्रारंभ केला.
• अतिरिक्त साठ्याची तरतूद करण्यासाठी, भारत सरकारने साखर कारखान्यांना 2018-19 मध्ये 5 दशलक्ष टन निर्यात अनिवार्यपणे करण्यास सांगितले आहे आणि बाहेरच्या मालवाहू सोयीसाठी काही आर्थिक सहाय्य देखील जाहीर केले आहे.
• निर्यात वाढविण्यासाठी चीन आणि इंडोनेशिया समेत अनेक देशांशी सरकार वाटाघाटी करीत आहे.
• दुसरीकडे चीनची साखर उत्पादन 15 दशलक्ष टन वार्षिक मागणीच्या तुलनेत जवळपास 10.5 दशलक्ष टन आहे. देशांतर्गत मागणी तसेच बफर स्टॉक तयार करण्यासाठी देश साखर आयात करतो.