14 नोव्हेंबरपासून सुरु होणार रामायण एक्सप्रेस

0
296

भारतीय रेल्वेने नुकतीच रामायण एक्सप्रेस सुरु करण्याची घोषणा केली आहे. ही ट्रेन 14 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात येणार आहे.

सद्या देशात राम मंदिर, रामाचा पुतळा, प्रभू रामचंद्र हे सगळेच विषय सुरु आहेत. मंदिर कधी बांधले जाणार, हा प्रश्न अधूनमधून विचारलाच जातो. यासगळ्यांमध्ये भारतीय रेल्वेने रामायण एक्सप्रेस सुरु करण्याची घोषणा केली आहे.
रामायण एक्सप्रेस प्रभू रामचन्द्रांशी संबंधित सगळ्या स्थळांची यात्रा करणार आहे. यामध्ये श्रीलंकेतील काही ठिकाणांचाही समावेश करण्यात आला आहे. भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीप्रमाणे ही एकूण 16 दिवसांची सहल असणार आहे.
16 दिवसांची अशी एक पॅकेज यात्रा संपल्यावर दुसरी यात्रा सुरु होईल. दिल्लीहून या यात्रेला हिरवी झंडी दाखवली जाईल.
ही बातमी यायच्या सोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शरयू नदीच्या किनारी रामाच्या पुतळ्याची घोषणा केली आहे. तसेच राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्यात यावा असे सुद्धा म्हटले आहे.