10 मीटर एअर रायफलमध्ये अपूर्वी चंदेला जागतिक क्रमवारीत शीर्षस्थानी

0
14

आंतरराष्ट्रीय नेमबाजी खेळ फेडरेशनने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 1 मे, 2019 रोजी भारताची अपूर्वी चंदेलाने 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

• जयपूरची अपूर्वी चंदेला ही देशाच्या 2020 ओलंपिक कोटात आधीच सुरक्षीत असलेल्या पाच भारतीय नेमबाजांपैकी एक आहे.

अपूर्वी चंदेला :

• 2012 मध्ये, चांदेला हिने नवी दिल्लीतील राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले.
• 2014 मध्ये तिने द हेग मधील इंटर्नशूट चॅम्पियनशिपमध्ये चार पदक जिंकले, त्यात दोन वैयक्तिक आणि दोन संघ पदकांचा समावेश होता.
• त्याच वर्षी, तिने ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये एक सुवर्णपदक जिंकले. यात तिने अंतिम सामन्यात 206.7 गुण मिळवून नवीन गेम रेकॉर्ड तयार केला.
• चंदेला 2016 च्या रिओ ऑलिंपिकसाठी महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत पात्र ठरली होती, ज्याच्या पात्रता फेरीत 51 स्पर्धकांमध्ये ती 34 व्या क्रमावर होती.
• 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने 10 मीटर एअर रायफल मिश्रित संघ स्पर्धेसाठी रवीकुमार बरोबर खेळून तिने कांस्य पदक जिंकले.
• 2018 च्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने कांस्यपदक जिंकले.
• फेब्रुवारी 2019 मध्ये, चंदेलाने न्यूझीलंडमधील आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन (आयएसएसएफ) विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण जिंकण्यासाठी 252.9 च्या विश्वविक्रम स्कोअरवर विजय मिळवला.
• 26 वर्षीय चंदेला हिने टोकियो ओलंपिक साठी आपले स्थान निश्चित केले आहे. बीजिंगमधील नुकत्याच संपलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत 207.8 च्या एकूण स्कोअरसह तिने चौथे स्थान पटकावले होते.

इतर भारतीय नेमबाज:

• 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत चंदेलाला पहिला क्रमांक मिळाला, तर दुसऱ्या स्थानी भारतीय नेमबाज अंजुम मौडगिल हीआहे.
• बीजिंगमधील आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत मौडगिलने 10 मीटर एअर रायफलमध्ये जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावला.
• मनु भाकेर ही 25 मीटर पिस्तूल महिला वर्गात 10 व्या स्थानावर आहे.
• पुरुषांमध्ये, दिव्यांश सिंग पन्वर 10 मीटर एअर रायफल प्रकारात जगातील चौथे स्थानावर आहे. या यादीत त्याची वाढ बीजिंगमधील आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत जिंकलेले दोन सुवर्णपदक मुळे आहे.
• 10 मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये आणि 10 मीटर एअर रायफल मिश्रित संघात सुवर्ण पदक मिळविण्याव्यतिरिक्त, पन्वरने 2020 टोक्यो ऑलिंपिकमध्ये आपली जागादेखील सुरक्षित केली आहे.
• बीजिंग येथे सुवर्ण पदक जिंकल्यानंतर भारताच्या अभिषेक वर्मा याने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारातही जागतिक क्रमवारीत तिसरे स्थान प्राप्त केले आहे.
• यानंतर पुढच्या क्रमांकावर असलेला नेमबाज म्हणजे भारतीय किशोरवयीन खेळाडू सौरभ चौधरी हा 6 व्या स्थानी आहे.
• यासोबत, भारताचा प्रतिभावान युवा नेमबाज अनिश भानवाला याने 25 मीटर वेगवान फायर पिस्तूल प्रकारात 10 वे स्थान मिळविले.