​ रेखा बैजल यांना साहित्य अकादमी पुरस्कार

0
41

साहित्यिक रेखा बैजल यांच्या ‘मौत से जिंदगी की ओर’ या हिंदी कादंबरीस म. रा. हिंदी साहित्य अकादमी तर्फे दिला जाणारा ‘जैनेंद्रकुमार जैन उपन्यास पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

रेखा बैजल या मराठवाड्यातल्या जालना या गावी राहणार्‍या मराठी लेखिका आहेत. रेखा बैजल यांची आतापर्यंत हिंदी व मराठी भाषेत ३५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 1954 पासून दरवर्षी भारतीय भाषेतील सर्वोत्तम कामांसाठी साहित्य अकादमीचे पुरस्कार दिले जातात, ज्यामध्ये ताम्रपत्र तसेच रोख रक्कम दिली जाते. 

रेखा बैजल यांना मिळालेले पुरस्कार

 • अग्निपुष्प (कादंबरी) – बा.सी. मर्ढेकर पुरस्कार, नरहर कुरुंदकर पुरस्कार
 • आदिम (एकांकिका) – वि.र. बाम पुरस्कार
 • आदिम (कथासंग्रह) – महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
 • जलपर्व (कादंबरी) – महाराष्ट्र सिंचन सहयोग पुरस्कार
 • तृप्ता (कादंबरी) – महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
 • प्रकाशाची फुले (कादंबरी) – आगाशे पुरस्कार
 • भिंत काचेची (नाटक) – महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
 • मम्मी रोबो (एकांकिका) – वि.र.बाम पुरस्कार
 • युगावर्त (कादंबरी) – महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार, कमलाबाई जामकर पुरस्कार, नाथमाधव पुरस्कार
 • स्वप्नस्थ (कथासंग्रह) – दि.बा. मोकाशी पुरस्कार
  • अनंत काणेकर पुरस्कार
  • कुसुमताई चव्हाण पुरस्कार
  • पुणे मराठी ग्रंथालय पुरस्कार
  • स्वातंत्र्य सेनानी चारठणकर पुरस्कार