२२ भाषांपैकी कोणत्याही भाषेत आता राज्यसभेत देता येणार भाषण

0
16

संविधान सुचीतील २२ भाषांपैकी कोणत्याही भाषेत आता संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात भाषण देता येणार आहे. यासंदर्भातील निर्णय राज्यसभा अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडूंनी केली आहे. तसेच डोंगरी, काश्मिरी, कोकणी, संथाली आणि सिंधी भाषेच्या अनुवादाचीही व्यवस्था राज्यसभा सचिवालयाने केलेली आहे.

राज्यसभेत २२ भाषांपैकी ११ भाषांसाठी अनुवादकांची व्यवस्था होती. त्या भाषांमध्ये आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कानडी, मल्याळम, मराठी, ओडीसी, पंजाबी, तामीळ, तेलगु आणि उर्दूचा समावेश होता. पण आता वरील पाच भाषांसाठीही अनुवादक नेमण्यात आले आहे. तसेच बोडो, मैथली, मणिपुरी, मराठी आणि नेपाळी या भाषांसाठी लोकसभेमध्येही अनुवादक नेमण्यात येणार आहेत.