२०० बळी घेणारी झूलन पहिली महिला क्रिकेटपटू

0
13

वन-डे सामन्यांमध्ये २०० बळी घेणारी भारताची वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी ही पहिला महिला क्रिकेटपटू ठरली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या वन-डे सामन्यात झूलनने हा विक्रम केला.

# कारकीर्दीतील १६६वा सामना खेळणाऱ्या ३५ वर्षीय झूलनने दक्षिण आफ्रिकेची सलामीची फलंदाज लारा वूलवार्टला बाद करत २००वा बळी घेतला.

# पुरुषांमध्ये पहिले २०० आंतरराष्ट्रीय बळी घेणारेही भारताचे गोलदांज कपिल देव होते. मे २०१७ मध्ये झूलन ही सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरली होती. 

# महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी टिपण्याचा विक्रम झुलनच्याच नावे आहे. तिच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाची कॅथरिन फिट्झपॅट्रिक दुसऱ्या तर लिसा स्थळेकर तिसऱ्या स्थानी आहे.  
 
# झूलनने ऑस्ट्रेलियाच्या कॅथरीन फित्झपॅट्रीकचा किमान दशकापूर्वीचा १८० बळींचा विक्रम मोडीत काढला आहे. झूलनने २००२ मध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर २००७ मध्ये ती आयसीसीची सर्वोत्कृष्ठ महिला क्रिकेटपटू ठरली होती.