हॉलिवूड अभिनेते बर्ट रेनॉल्ड्स यांचे निधन

0
203

हॉलिवूड अभिनेते बर्ट रेनॉल्ड्स यांचे हृदयविकाराच्या झटक्याने फ्लोरिडा येथे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. डॅन ऑगस्ट आणि गन स्मोकसारख्या अनेक टीव्ही शोमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या. तर १९९७ मध्ये बुगी नाइट्स या सिनेमासाठी ऑस्कर नामांकन मिळाले होते. इव्हिनिंग शेड्स या सिनेमातील भूमिकेसाठी बर्ट रेनॉल्ड्स यांना गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

हॉलिवूड सिनेसृष्टी आणि टीव्ही यामध्ये बर्ट रेनॉल्ड यांची कारकीर्द प्रदीर्घ होती. ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवुड’या सिनेमासह इतर काही सिनेमांमध्ये ते आत्ताही काम करत होते. या सिनेमात त्यांच्यासोबत ब्रॅड पिट आणि लिओनार्दो डी कॅप्रिओही यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अँजल बेबी हा १९६१ मध्ये आलेला त्यांचा पहिला सिनेमा होता. ‘अवर मॅन फ्लिंट’, ‘व्हाइट लाइटनिंग’, ‘द मॅन हू लव्ह्ड कॅट डान्सिंग’, ‘लकी लेडी’ यांसारख्या सिनेमांनी त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचवले.