हिना सिद्धू, जितू रायने पटकाविले सुवर्णपदक

0
16

जागतिक नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या हिना सिद्धू आणि जितू राय यांनी सुवर्णपदक पटकाविले.

# दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शुटींग रेंजमध्ये सुरु असलेल्या जागतिक स्पर्धेत हिना आणि जितू या जोडीने पहिले सुवर्णपदक मिळविले.

# या दोघांचे आतापर्यंत मिश्र प्रकारात तिसरे सुवर्णपदक आहे. या दोघांनी 483.4 गुण मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

# या वर्षाच्या अखेरीस जागितक स्पर्धा घेण्यात येणार असून, त्यातून 2020 मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी खेळाडू पात्र होणार आहेत.

# भारतात प्रथमच होत असलेल्या जागतिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक मिळविल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

# फ्रान्सच्या गोबरवील आणि फॉक्युट यांनी रौप्य, तर चीनच्या काई आणि यांग या जोडीने ब्राँझपदक मिळविले.