हिंदी वर्ड ऑफ दि इयर 2018 : आधार

0
30

जगभरात प्रसिद्ध असलेला इंग्रजी शब्दकोश अर्थात ऑक्सफोर्ड डिक्शनरी दरवर्षी ‘इंग्रजी वर्ड ऑफ दि इयर’ घोषित करते. त्याचप्रमाणे ऑक्सफोर्डने यंदा पहिल्यांदाच ‘हिंदी वर्ड ऑफ दि इयर’ घोषित केला असून २०१७सालासाठी हा मान ‘आधार’ या शब्दाला मिळाला आहे.

# जगप्रसिद्ध इंग्रजी अर्थात ऑक्सफर्ड डिक्शनरी दरवर्षी ‘इंग्रजी वर्ड ऑफ द ईअर’ घोषित करते.

# त्याचप्रमाणे ऑक्सफर्डने यंदा पहिल्यांदाच हिंदी वर्ड ऑफ द ईअर म्हणून २०१७ सालासाठी हा मान ‘आधार’ या शब्दाला मिळाला आहे.

# राजस्थानमध्ये सुरु असलेल्या जयपूर साहित्य संमेलनात [जेएलएफ़] शनिवारी ऑक्सफर्ड डिक्शनरीकडून ही घोषणा करण्यात आली.

# गेल्या वर्षी सर्वात जास्त चर्चा झालेला आणि जनतेचे लक्ष वेधून घेणाऱ्या शब्दाची निवड समितीने निवड केली.

# ‘हिंदी वर्ड ऑफ दि इयर’च्या स्पर्धेमध्ये नोटबंदी, स्वच्छ, आधार, योग, विकास, बाहुबली असे अनेक पर्यायी शब्द होते. अखेर यांमधून ‘आधार’ या शब्दाची निवड करण्यात आली.

# भारत सरकारने देशवासियांना एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यासाठी ‘आधार’ ही योजना जाहीर केली.

# सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. त्याचबरोबर बँक खाती आणि मोबाईलसाठीही ‘आधार’ गरजेचा झाला आहे. त्यामुळे आधार कार्ड आता हळूहळू प्रमुख ओळखपत्र म्हणून पुढे येत आहे.