स्व. बी.जी देशमुख यांना मरणोत्तर उत्तम प्रशासकाचा पुरस्कार

0
19

माजी कॅबीनेट सचिव स्वर्गीय भालचंद्र गोपाल देशमूख यांना मरणोत्तर उत्तम प्रशासकाचा पॉल एच. एप्ली या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या वतीने पॉल एच.एप्ली यांच्या नावाने दिला जाणारा उत्तम प्रशासकाचा सन्माननीय पुरस्कार माजी कॅबिनेट सचिव भालचंद्र गोपाळ देशमुख यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. 

स्वर्गीय भालचंद्र गोपाल देशमुख यांनी केंद्र शासनामध्ये विविध महत्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी “ए कॅबिनेट सेक्रेटरी थिंक्‍स ए लॉउड’, “ए कॅबिनेट सेक्रेटरी लुक्‍स अराउँड’, “ए पूना टू प्राइम मिनीस्टर ऑफीस’, “ए कॅबिनेट सेक्रेटरी लूक्‍स बॅक’ ही आणि इतर महत्त्वपूर्ण पुस्तके लिहीलेली आहेत.

त्यांनी कॅबीनेट सचिव म्हणून केलेल्या कारर्कीदीत लोक प्रशासनात नवीन पायंडे पाडले आहेत. त्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त, केंद्र शासनात विविध पदांवर काम केलेले आहे. यासह महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून निभावलेली भुमिका निभावली आहे. देशमुख यांनी राजीव गांधी, व्हि. पी. सिंग आणि चंद्रशेखर या तीन माजी प्रधानमंत्र्यांसोबत काम केलेले आहे. यासह अंतराराष्ट्रीय कामगार संगठनेतही काम केले आहे. 1985-86 दरम्यान देशमुख हे भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्रामध्ये असणा-या क्षेत्रीय संस्थेवरही होते.