स्नेहलता श्रीवास्तव लोकसभेच्या महिला सरचिटणीस

0
13

लोकसभेच्या सरचिटणीसपदी स्नेहलता श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्नेहलता या लोकसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस ठरल्या आहेत.

# लोकसभेच्या सरचिटणीसपदी स्नेहलता श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

# स्नेहलता या लोकसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस ठरल्या आहेत. 

# लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी शुक्रवारी श्रीवास्तव यांची सभागृहाला ओळख करुन दिली.

# स्नेहलता श्रीवास्तव यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत असेल.  विद्यमान सरचिटणीस अनुप मिश्रा यांच्याकडून स्नेहलता श्रीवास्तव पदभार स्वीकारतील. 

# यापूर्वी राज्यसभेत रमा देवी या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून कार्यरत राहिल्या आहेत. मात्र लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला सरचिटणीसपदी विराजमान होत आहे. 

# मध्य प्रदेश कॅडरच्या 1982 च्या बॅचमधील स्नेहलता श्रीवास्तव यांनी केंद्र सरकारच्या न्याय विभाग, वित्त मंत्रालय आणि नाबार्ड सारख्या ठिकाणी काम केलं आहे.