स्त्री-पुरुष समानतेत भारत १०८ व्या क्रमांकावर

0
34

‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या (WEF) जागतिक स्त्रीपुरुष समानता निर्देशांकात (ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स) देशाचे स्थान यंदा २१ अंकांनी घसरले आहे. त्यामुळे यादीत भारत १०८व्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

# देशातील अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचे योगदान कमी असणे आणि त्यांना पुरुषांच्या तुलनेत कमी मिळणारे वेतन ही यामागील यामागे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

# या यादीत भारत शेजारी राष्ट्र बांगलादेश आणि चीनपेक्षाही मागे आहे. यादीत बांगलादेश ७४व्या स्थानी असून, चीन १००व्या क्रमांकावर आहे. २००६मध्ये ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने जेंडर गॅपचे निकष निर्धारित करून जगभरातील देशांची यादी तयार करण्यास सुरुवात केली. २००७मध्ये जेव्हा पहिली यादी जाहीर झाली, त्यावेळी भारत ९८व्या क्रमांकावर होता.

म​हिलांचा सहभाग महत्वाचा 

महिलांना मिळणाऱ्या संधींमध्ये भारताचे स्थान १३९वे, तर आरोग्य आणि मिळणाऱ्या सोयीसुविधांमध्ये १४१वे आहे. यादीमध्ये भारताच्या क्रमवारीत घसरण होण्यामागे घटते राजकीय प्रतिनिधित्व, वाढते अनारोग्य आणि शिक्षणातील घसरणारा टक्का ही प्रमुख कारणे असल्याचे मतही फोरमने नोंदवले आहे. राजकारणी, वरिष्ठ अधिकारी, व्यवस्थापक आणि तांत्रिक मनुष्यबळामध्ये महिलांचे प्रमाण वाढण्याची आवश्यकताही नमूद करण्यात आल​ी आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (World Economic Forum) :

जगाची स्थिती सुधारण्यासाठी कटिबद्ध असलेल्या जागतिक आर्थिक मंचाने सार्वजनिक-खाजगी सहकार्यासाठीचे आंतरराष्ट्रीय संघटन आहे.