सौरमालिकेबाहेर अत्यंत उष्ण ग्रहाचा शोध

0
19

सौरमंडळाच्या बाहेर पृथ्वीसारख्या आकाराच्या गृहाचा शोध खगोल शास्त्रज्ञानांच्या एका आंतराष्ट्रीय पथकाने लावला आहे. के-२-२२९ बी असे नाव या ग्रहाला दिले आहे.

# संशोधकांनी आपल्या सौरमालिकेबाहेर 26 कोटी प्रकाशवर्ष अंतरावरील एका अत्यंत उष्ण ग्रहाचा शोध घेतला आहे. हा ग्रह पृथ्वीपेक्षा वीसपटींनी मोठा आहे. त्याचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा अडीच पटींनी अधिक आहे.

# त्याचे दिवसाचे तापमान २००० अंश सेल्सियस असून तो त्याच्या मातृताऱ्यापासून सर्वात जवळ म्हणजे ०.०१२ खगोल एकक अंतरावर म्हणजे सूर्य व पृथ्वी यांच्यातील अंतराच्या एक शंभरांश अंतरावर आहे.

# कन्या तारकासमूहातील मध्यम आकाराच्या बटू ताऱ्याभोवती तो फिरत असून के २-२२९ बी ग्रह मातृताऱ्याभोवती एक प्रदक्षिणा चौदा तासांत पूर्ण करतो.

# के २ दुर्बिणीच्या मदतीने फ्रान्सच्या एक्स मार्सेली व ब्रिटनच्या वॉरविक विद्यापीठातील वैज्ञानिकांनी हा ग्रह शोधला असून, त्यात डॉप्लर वर्णपंक्तीशास्त्राचा वापर करण्यात आला आहे. त्याला वुबल पद्धत असेही म्हणतात.

# खगोलवैज्ञानिकांना हा ग्रह तेथे असल्याचे अंधूक प्रकाशावरून जाणवत होते. हा ग्रह ताऱ्यासमोरून जात असताना त्याचा प्रकाश काही प्रमाणात झाकला जात होता.