सौम्या स्वामिनाथन यांची WHO च्या उपमहासंचालकपदी

0
19

इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) डॉ. सौम्या स्वामिनाथन यांची जागतिक आरोग्य संघटनेतर्फे (डब्ल्यूएचओ) होणाऱ्या कार्यक्रम विभागाच्या उपमहासंचालकपदी नुकतीच निवड करण्यात आली.

१४ देशातील विविध प्रतिनिधी डॉ सौम्या यांच्या कार्याची दखल घेऊन या महत्वाच्या मानाच्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेत एवढ्या मोठ्या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय महिला आहेत. भारतीय हरितक्रांतीचे जनक व कृषी वैज्ञानिक डॉ एम एस स्वामीनाथन यांच्या त्या कन्या आहेत.

त्या एक बालरोग तज्ञ असून दिल्ली एम्समधून येथून पदव्युत्तर शिक्षण घेतले, काही वर्षे ब्रिटनमध्ये व कॅलिफोर्निया येथे नोकरी केली. सध्या त्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या [आयसीएमआर] महासंचालक आहेत. त्या भारतीय आरोग्य संशोधन विभागाच्या सचिवही आहेत. त्यांनी युनिसेफसाठीही काम केले आहे.

त्यांना लाहिरी सुवर्णपदक, कनिष्का पुरस्कार, इंडियन असोशिएशन ऑफ अप्लाइड सायन्स पुरस्कार आदी पुरस्करानी सन्मानित करण्यात आले आहे.