सौदी अरेबियात ‘योग’ला खेळाचा दर्जा

0
22

जगभरात प्रभाव पाडणाऱया योगला आता सौदी अरेबियात देखील मान्यता मिळाली. सौदी अरेबियाच्या व्यापार तसेच उद्योग मंत्रालयाने योगला खेळाच्या रुपात मान्यता दिली. या मान्यतेमुळे कट्टर इस्लामिक देशात योग शिक्षण देता येईल तसेच त्यासाठीचा परवाना प्राप्त करता येणार आहे.

# भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाचा प्रचार-प्रसार केल्याने त्याची दखल जगभरातील देश घेत आहेत. इस्लामिक देश असलेल्या सौदी अरबने तर योगाला खेळाचा अधिकृत दर्जा दिला आहे. 

# सौदी अरबच्या व्यापार आणि उद्योग मंत्रालयाने खेळाचा एक भाग म्हणून योग शिकण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे सौदी अरबमध्ये आता परवाना घेऊन योग शिकविला जाणार आहे. 

# ‘नोफ मारवाई’ नावाच्या महिलेला पहिली योग प्रशिक्षिकेचा दर्जाही देण्यात आला आहे. योगाला खेळाचा दर्जा मिळावा म्हणून नोफ मारवाई यांनी विशेष प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी मोठं अभियान चालवलं होतं. त्यांनी ‘अरब योग फाऊंडेशन’चीही स्थापना केली होती. 

# भारताच्या प्रयत्नामुळे २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र संघाने योगाला वैश्विक स्तरावर मान्यता दिली आहे. त्यामुळे दरवर्षी जगभरात २१ जून हा दिवस ‘योग दिन’ म्हणून साजरा केला जातो.