सौदी अरेबियाचा ऐतिहासिक निर्णय

0
15

महिलांना ड्रायव्हिंग करण्याची परवानगी देणारा ऐतिहासिक निर्णय सौदी अरेबियाने जाहीर केला आहे.

सौदी अरेबियाने महिलांना ड्‍रायव्हिंग करण्याची परवानगी देणारा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. सन 2018 पासून महिलांना ड्रायव्हिंग करण्याची परवानगी आणि ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात येणार आहे. आणि इतर देशांनी महिलांना दिलेल्या ड्रायव्हिंग लायसन्सला मान्यताही देणार आहे.

सुधारणेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत व्यक्त होत आहे. संपूर्ण जगात महिलांना ड्‍रायव्हिंग करण्यावर बंदी असणारा अतिपुराणमतवादी सौदी अरेबिया हा एकमेव देश होता आणि या गोष्टीबद्‌दल त्यावर जगभरातून टीकाही होत होती.