सुशील चंद्रा यांची नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती

0
506

15 फेब्रुवारी 2019 रोजी सुशील चंद्रा यांनी भारताचे नवीन निवडणूक आयुक्त (ईसी) म्हणून कार्यपद हाती घेतले. निवडणूक आयोगामध्ये ते मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्यासह काम करतील.

• निवडणूक कमिशनर सामान्यपणे सेवानिवृत्त आयएएस किंवा आयआरएस अधिकारी असतात.
• 1989 पर्यंत निवडणूक आयोग एक सदस्यीय मंडळ होता, परंतु नंतर दोन अतिरिक्त निवडणूक आयुक्तांना समाविष्ट करण्यात आले.
• अशा प्रकारे निवडणूक आयोगात सध्या एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त आहेत.
• बहुमतद्वारे आयोगाचे निर्णय घेतले जातात.
• निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो.

सुशील चंद्रा :

• सुशील चंद्रा हे 1980 बॅचचे भारतीय महसूल सेवा अधिकारी आहेत.
• आयआरएस सेवेमध्ये चंद्रा यांनी उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये आपली सेवा प्रदान केली.
• त्यांना आंतरराष्ट्रीय कर आणि तपासणीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्य करण्याचे कौशल्य आहे.
• निवडणूक आयोगास सामील होण्याआधी, चंद्रा वित्त मंत्रालयाच्या केंद्रीय कर मंडळाचे अध्यक्ष होते.

निवडणूक आयुक्त :

• 1950 मध्ये निवडणूक आयोगात केवळ मुख्य निवडणूक आयुक्त होते. 16 ऑक्टोबर, 1989 रोजी पहिल्यांदाच आयोगात दोन अतिरिक्त कमिश्नर नियुक्त करण्यात आले होते परंतु हा निर्णय 1 जानेवारी, 1990 रोजी परत घेण्यात आला होता.
• निवडणूक आयुक्त दुरुस्ती अधिनियम, 1989 ने आयोगाला बहु-सदस्यीय संस्था बनविली.
• त्यानंतर हा आयोग 3 सदस्यीय संस्था असून यात बहुमताने निर्णय घेतले जातात.