सुवर्णपदक मिळवणारी सरनौबत राही पहिली महिला नेमबाज

0
459

आशियाई खेळांच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्राच्या राही सरनौबतने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली. २५ मी. पिस्तुल प्रकारात राहीने सुवर्णपदक पटकावले. असा पराक्रम करणारी राही ही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे.

पहिल्या फेरीपासून सर्वोत्तम खेळ करत राहीने आपलं अव्वल स्थान कायम राहिलं होतं. मात्र शेवटच्या क्षणांमध्ये थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने राहीला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं. अंतिम फेरीआधी दोन्ही खेळाडूंचे गुण समान झाले, त्यामुळे सुवर्णपदकासाठी राही आणि थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूमध्ये शूटऑफवर निर्णय घेण्यात आला. पहिल्या शूटऑफमध्येही दोन्ही खेळाडूंचे ४-४ गुण झाल्यामुळे दुसऱ्यांदा शूटआऊटवर सामना खेळवण्यात आला. या शूटऑफवर राहीने ३-२ ने बाजी मारत सुवर्णपदक आपल्या नावे केलं.