सुदर्शन पट्टनाईक यांना यू.एस. मध्ये पीपल्स चॉईस पुरस्कार प्रदान करण्यात आला

0
15

प्रख्यात भारतीय वाळू कलाकार आणि पद्म पुरस्कारप्राप्त सुदर्शन पट्टनाईक यांना युनायटेड स्टेट (अमेरिकेत) येथील प्रतिष्ठित वाळू शिल्पकला महोत्सवात पीपल्स चॉईस अवॉर्ड मिळाला आहे.

• बोस्टनमध्ये रेव्हर बीच आंतरराष्ट्रीय वाळू शिल्पकला महोत्सवात भाग घेण्यासाठी जगभरातून निवडलेल्या 15 सर्वोत्तम वाळू कलाकारांपैकी सुदर्शन एक होते.
• त्यांनी अमेरिकन लोकांना आपल्या शिल्पकलेने महासागरातील प्लास्टिक प्रदूषणाविरूद्ध लढा देण्याचा संदेश दिला.

मुख्य वैशिष्ट्ये :

• सुदर्शन पट्टनाईक हे भारत तसेच आशियाचे एकमेव प्रतिनिधी होते.
• ‘प्लॅस्टिक प्रदूषण थांबवा, आपला महासागर वाचवा’ असा संदेश देऊन प्लास्टिक प्रदूषणावरील वाळूच्या कलेसाठी त्यांना ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’ मिळाला.
• आपल्या वाळूच्या शिल्पातून त्यांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केला की मानवी क्रियाकलाप महासागराचा नाश करीत आहेत तसेच मानव समुद्रात, नद्यांमधून अन्न खाल्ल्याने प्रदूषित पाण्याचा सुद्धा मनुष्यावर परिणाम होत आहे.
• बेल्जियम आणि कॅनडा मधील कलाकारांनी देखील प्रतिष्ठित चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळविला.

रेव्हर बीच आंतरराष्ट्रीय वाळू शिल्पकला महोत्सव :

• हा जगातील सर्वात मोठा वाळू शिल्पकला उत्सव आहे आणि जगातील अग्रगण्य वाळू शिल्पकार यात सहभाग घेतात.
• हे रेव्हर बीच भागीदारी या विना-नफा संस्था आयोजित करीत आहे.
• या वाळूचा सणाला आता 16 व्या वर्ष पूर्ण झाली आहेत.
• 2019 चा उत्सव 26-28 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आला होता आणि जवळपास दहा लाख लोकांनी या महोत्सवात हजेरी लावली होती.