साहित्य संमेलन 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान बडोद्यात होणार

0
25

महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा अभिमानाने जोपासलेल्या बडोदा नगरीत आगामी
९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 16 ते 18 फेब्रुवारी 2018 दरम्यान होणार आहे.

बडोद्यातील हे चौथे साहित्य संमेलन असेल. यापूर्वी १९०१ मध्ये सातवे संमेलन, १९२१ मध्ये अकरावे संमेलन आणि १९३४ मध्ये विसावे संमेलन बडोद्यात झाले होते. आणि मागिल वर्षीचे साहित्य संमेलन डोंबिवलीत झाले होते. 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्यप्रेमी जनतेचा एक आनंदाचा उत्सव असतो. 

१८६५ साली न्या.रानडे यांनी मराठीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा आढावा घेतलेला दिसतो. त्यानुसार ४३१ गद्य आणि २३० पद्य पुस्तकांची निर्मिती झाल्याचे दिसते. ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या.रानडे यांनी  लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञान प्रकाश (फेब्रुवारी ७ १८७८) मधे प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार मे ११ १८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. या संमेलनाचे अध्यक्ष पद न्या.रानडे यांनीच भूषविले.