साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख

0
19

बडोदा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त आयएएस अधिकारी, कथाकार व कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली आहे. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी कादंबरीकार डॉ. रविंद्र शोभणे यांचा 70 मतांनी पराभव केला.

# ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये बडोदा येथे साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक रविवारी झाली. अध्यक्षपदासाठी लक्ष्मीकांत देशमुख, राजन खान, रवींद्र शोभणे, किशोर सानप, रवींद्र गुर्जर असे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

# ज्येष्ठ कादंबरीकार, कथालेखक व निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी साहित्यिक रवींद्र शोभणे यांचा ७० मतांनी पराभव केला. पंचरंगी लढतीत देशमुख यांना ४२७ मते मिळाली तर शोभणे यांना ३५७ मते मिळाली आहेत.

# सनदी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत असताना देशमुख यांनी ‘सलोमी’, ‘ऑक्टोपस’, ‘अंधेरनगरी’, ‘हरवलेले बालपण’, ‘अग्निपथ’, ‘मृगतृष्णा’ अशा २६ पुस्तकांचे लेखन केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्यप्रेमी जनतेचा एक आनंदाचा उत्सव असतो. 

१८६५ साली न्या.रानडे यांनी मराठीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा आढावा घेतलेला दिसतो. त्यानुसार ४३१ गद्य आणि २३० पद्य पुस्तकांची निर्मिती झाल्याचे दिसते. ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या.रानडे यांनी  लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञान प्रकाश (फेब्रुवारी ७ १८७८) मधे प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार मे ११ १८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. या संमेलनाचे अध्यक्ष पद न्या.रानडे यांनीच भूषविले.