सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी जनधन दर्शक ऍप सादर

0
347

सामान्य नागरिकांसाठी बॅंकिंग सुविधा सहजसोपी होण्यासाठी केंद्र सरकारने जनधन दर्शक ऍप सादर केले. या ऍपच्या माध्यमातून वापरकर्ता देशभरातील कोणत्याही बॅंक शाखेचा पत्ता शोधण्यास मदत होईल. या ऍपमध्ये देशातील बॅंक, एटीएम, पोस्ट ऑफिस आणि सामान्य सेवा केंद्रे यांची माहिती उपलब्ध होईल.

अर्थमंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या या ऍपमध्ये बॅंकांचे आयएफएससी कोड यांची माहिती मिळेल. या ऍपमध्ये सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील सर्व बॅंकांची माहिती उपलब्ध आहे. अर्थमंत्रालय, वित्तीय सेवा विभाग आणि नॅशनल इन्फोर्मेटिक्‍स सेन्टरच्या संयुक्त विद्यमाने हे ऍप विकसित करण्यात आले आहे. डिसेंबरपर्यंत 1.35 लाख बॅंक मित्र या ऍपच्या माध्यमातून जोडले जातील.