सहा राज्यांना रणजी क्रिकेट खेळण्याची परवानगी

0
19

सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर स्थापन केलेल्या प्रशासकीय समितीने ईशान्येतील सहा राज्यांना भारतीय क्रिकेटच्या प्रवाहात सामावून घेण्याचं ठरवलंय. यापुढे ईशान्येतल्या मेघालय, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या सहा राज्यांना रणजी क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळणार आहे.

 

बीसीसीआयच्या खेळ सुधारणा समितीचे प्रमुख रत्नाकर शेट्टी यांच्याकडे या सहा राज्यांना प्रवेश देण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्याचे अधिकार दिले आहेत.

यंदाचा रणजी हंगाम हा ६ ऑक्टोबरपासून सुरु होतोय. तर हा 84 वा सामना असणार आहे. 

बीसीसीआयच्या १६ वर्षाखालील मुलांसाठी खेळवल्या जाणाऱ्या विनू मंकड आणि २३ वर्षाखालील मुलांसाठी खेळवल्या जाणाऱ्या सी. के. नायडू स्पर्धेसाठीही ईशान्येच्या राज्यांकरता स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे.

रणजी ट्राफी बद्दल माहिती

बीसीसीआय च्या निर्मीती नंतर 1934 साली बोर्डाची शिमला येथे झालेल्या सभेत ए.एस.डी.मेलो यांनी बोर्डाला संलग्नित संघटनाच्या चमू मधे सामाने आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला त्या सामन्याकरिता देण्यात येणर्या ट्रॉफी ची रेखाकृती ही त्या बरोबर मांडली जी विजेता संघाला प्रदान करण्यात येईल. त्या चषकाला (ट्रॉफी) रणजी ट्रॉफी म्हणून संबोधण्यात आलेे. के. एस रणजीत सिंगजी च्या नावा वरून ह्या ट्रॉफीचे नाव देण्यात आले. 

पहिला सामना 4 नवंबर साली मद्रास आणि म्हैसूर या संघामधे आयोजित करण्यात आला. हा सामना एका दिवसात संपला होता आणि मुंबई संघ हा रणजी ट्रॉफी चा प्रथम विजेता होता.