सलील पारेख यांची इन्फोसेसच्या CEO पदी नियुक्ती

0
20

भारतातील अग्रगण्य आयटी कंपन्यांपैकी एक असणाऱ्या इन्फोसेसने आज सलील एस. पारेख यांची कंपनीच्या मुख्याधिकारी (सीईओ) आणि मॅनेजिंग डायरेक्टर (व्यवस्थापन संचालक) पदी नियुक्ती केली.

# सध्या पारेख हे मुळची फ्रान्सची असणारी आयटी कंपनी ‘कॅपजेमीनी’चे ग्रुपच्या कार्यकारी बोर्डाचे सदस्य आहेत. त्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापिठातून कंप्युटर सायन्स आणि मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये मास्टर्सची पदवी घेतली आहे.

# पारेख यांनी मुंबई आयआयटीमधून अॅरोनॉटिकल इंजिनियरींमध्ये बॅचरल ऑफ टेक्नॉलॉजी (बी. टेक.)चे शिक्षण घेतले आहे. 

# कंपनीचे सहसंस्थापक असलेले नंदन निलकेणी हेच इन्फोसेसचे अ-कार्यकारी अध्यक्ष रहातील. कंपनीचे हंगामी मुख्याधिकारी यू. बी. प्रवीण राव यांना मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बढती मिळाली आहे.