सर्वोच्च न्यायालयाने क्रिकेटपटू श्रीशांत वर लावलेली आजीवन बंदी काढून टाकली

0
296

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात क्रिकेटपटू श्रीशांतवर लावण्यात आलेली आजीवन बंदी सर्वोच्च न्यायालयाने मार्च 15, 2019 रोजी काढून टाकली आहे. न्यायाधीश अशोक भुषण आणि के एम जोसेफ यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला.

• यासोबत सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला श्रीशांतच्या शिक्षेवर फेरविचार करण्यासाठी सांगितले आहे.
• सर्वोच्च न्यायालयाने शिस्तपालन समितीला यासाठी तीन महिन्याचा अवधी दिला आहे.
• सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की बीसीसीआयला खेळाडू शिस्तभंगाच्या प्रकरणात कारवाई करण्याचा अधिकार आहे, परंतु श्रीशांत ला दिलेली शिक्षा उचित असल्यापेक्षा जास्त आहे.
• 2013 मध्ये IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरण उघडकीस आल्यानंतर श्रीशांतवर बंदी घालण्यात आली होती. त्यावर्षी श्रीशांत राजस्थान रॉयल्स संघासाठी खेळला होता. याचवेळी त्याच्या वर आरोप लावण्यात आला होता.
• दिल्ली न्यायालयाने आधीच श्रीशांतला निर्दोष साबित केले होते, परंतु केरळ उच्च न्यायालयाने ह्या निर्णयाविरुद्ध जाऊन बीसीसीआयने लावलेली बंदी उचित आहे असे म्हटले होते.
• 2013 च्या IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बीसीसीआयने श्रीशांतला दोषी करार करून आजीवन बंदी घातली होती, त्याविरुद्ध श्रीशांतने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

एस श्रीशांत :

• श्रीशांतने 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध नागपूर एकदिवसीय सोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
• 2006 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळतांना त्याने कसोटी सामन्यात पदार्पण केले.
• श्रीशांतने 27 कसोटी सामन्यात 37.59 च्या सरासरीने 87 बळी घेतले आणि एकदिवसीय सामन्यात 53 सामन्यात 33.44 च्या सरासरीने 75 बळी घेतले.

स्पॉट-फिक्सिंग :

• स्पॉट-फिक्सिंग हे क्रिकेटमध्ये असणारी बेकायदेशीर क्रिया आहे ज्यात खेळाचा एक विशेष भाग स्थिर केला जातो. स्पॉट फिक्सिंग मात्र एक खेळाडूद्वारे सुद्धा केली जाऊ शकते. मॅच फिक्सिंग सहसा पूर्ण सामन्याची जीत किंवा हार हे ठरवते, जेव्हा स्पॉट-फिक्सिंग हे एखादा बॉल किंवा एक पूर्ण ओव्हर साठी केली जाते.
• स्पॉट-फिक्सिंग फलंदाज आणि फिल्डर यांच्या सोबतही केली जाऊ शकते. सामान्यतः बुकीज लोक ओव्हर प्रमाणे गोलंदाज सोबत स्पॉट-फिक्सिंग ठरवतात. कोणत्या ओव्हरमध्ये किती रन द्यायचे, नो बॉल किंवा व्हाईड बॉल द्यायचे हे नक्की केले जाते.