संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅले यांचा राजीनामा

0
197

संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या राजदूनत निक्की हॅले यांनी राजीनामा दिला आहे. हॅले या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक असून ट्रम्प प्रशासनातील पहिल्या महिला असून त्यांना कॅबिनेट दर्जाचे स्थान आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा राजीनामा स्विकारला आहे.

संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या राजदूनत निक्की हॅले यांनी राजीनामा दिला आहे. हॅले या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक असून ट्रम्प प्रशासनातील पहिल्या महिला असून त्यांना कॅबिनेट दर्जाचे स्थान आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा राजीनामा स्विकारला आहे. अमेरिकेतील फॉक्स न्यूजच्या हवाल्याने एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. हॅले ट्रम्प यांच्या ओव्हल कार्यालयात स्थानिक प्रमाणवेळेनुसार मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेणार आहेत.

हॅले यांनी यापूर्वीच ट्रम्प यांना राजीनामा देणार असल्याचे कळवले होते. त्यानंतर त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये राजीनामा दिला. २०२०पर्यंत आपण संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रतिनिधी म्हणून राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ट्रम्प यांच्यासाठी आपण मोहिम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये उत्कृष्ट काम केले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील पहिली महिला होण्याचा मान भारतीय वंशाच्या निक्की हॅले यांना मिळाला होता. निक्की हॅले यांची संयुक्त राष्ट्रातील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सध्या हॅले दक्षिण कॅरिलोना राज्याच्या राज्यपाल आहे. ४६ वर्षांच्या हॅले या ट्रम्प यांच्या प्रशासनाकीय विभागात नेमणूक झालेल्या पहिल्याच महिला होत्या. आतापर्यंत कोणत्याही भारतीय-अमेरिकन व्यक्तीला अमेरिकेन अध्यक्षांच्या प्रशासकीय विभागात कॅबिनेट दर्जाचे स्थान मिळालेले नव्हते, ते हॅले यांना मिळाले होते. अमेरिकेच्या प्रशासकीय विभागात कॅबिनेट दर्जाचे स्थान मिळवण्यासाठी सिनेटची परवानगी लागते.