संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेवर भारताची निवड

0
281

संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेवर भारताची तीन वर्षांसाठी निवड झाली. विशेष म्हणजे, परिषदेच्या सदस्यपदासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या देशांमध्ये बाजी मारताना भारताने सर्वांधिक 188 मते मिळवली.

आशिया-पॅसिफिक विभागातून भारताने ही निवडणूक लढवली. या वर्गातून निवडूून दिल्या जाण्याच्या पाच सदस्यपदांसाठी भारतासह बहारीन, बांगलादेश, फिजी आणि फिलिपाईन्स या पाच देशांकडून दावा करण्यात आला. त्यामुळे भारताचा विजय निश्‍चित होता. परिषदेवर निवडूून जाण्यासाठी किमान 97 मतांची गरज होती. त्यापेक्षा जवळपास दुप्पट मते भारताला मिळाली. परिषदेचे सदस्य म्हणून भारतासह 18 देशांची पाच विभागांतून निवड झाली.

भारतासह परिषदेच्या नव्या सदस्यांची मुदत 1 जानेवारी 2019 पासून सुरू होईल. याआधी 2011 ते 2017 अशा सलग दोन कार्यकाळांसाठी भारताची जीनिव्हास्थित परिषदेवर निवड झाली होती.