श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी पुन्हा विक्रमसिंघे

0
238

“युनायटेड नॅशनल पार्टी’चे (यूएनपी) सर्वेसर्वा रानिल विक्रमसिंघे यांनी आज पुन्हा एकदा श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनीच त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

विक्रमसिंघे यांच्या शपथविधीमुळे श्रीलंकेत मागील 51 दिवसांपासून सुरू असलेला राजकीय संघर्ष संपुष्टात आला आहे. सिरीसेना यांनीच विक्रमसिंघे यांची 26 ऑक्‍टोबर रोजी हकालपट्टी केल्यानंतर श्रीलंकेमध्ये घटनात्मक पेच निर्माण झाला होता. विशेष म्हणजे अध्यक्षांच्या आदेशानंतरदेखील विक्रमसिंघे यांनी पदावरून पायउतार होण्यास नकार दिला होता.