शेख हसीना बांग्लादेशाच्या नव्या पंतप्रधान

0
310

बांग्लादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेख हसीना व त्यांचा पक्ष ‘अवामी लीग’ सलग तिसऱ्यांदा विजयी झाला आहे.

बांग्लादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेख हसीना व त्यांचा पक्ष ‘अवामी लीग’ सलग तिसऱ्यांदा विजयी झाला आहे. त्या बांग्लादेशाच्या 11व्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. 300 जागांपैकी 260 जागा जिंकत सत्तारूढ अवामी लीगच्या नेतृत्त्वाखालील आघाडीने बांग्लादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत यश मिळवले आहे.

शेख हसीना (जन्म: २८ सप्टेंबर १९४९) ह्या दक्षिण आशियामधील बांगलादेशच्या विद्यमान पंतप्रधान आहेत.ह्यापूर्वी १९९६ ते २००१ दरम्यान त्या ह्या पदावर होत्या. शेख हसीना बांगलादेशाचे स्वातंत्र्यसैनिक व पहिले पंतप्रधान शेख मुजिबुर रहमान ह्यांची मुलगी असून त्या १९८१ सालापासून बांगलादेश अवामी लीग ह्या राजकीय पक्षाच्या पक्षाध्यक्ष आहेत. गेली चार दशके देशाच्या  राजकारणामध्ये कार्यरत असलेल्या हसीना ह्यांच्यावर अनेकदा भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले आहेत. बेगम खालेदा झिया ह्या शेख हसीनांच्या प्रतिस्पर्धी असून त्या दोन नेत्यांनी गेली २० वर्षे बांगलादेशाच्या राजकारणावर आपली पकड ठेवली आहे.