शुभांगी स्वरूप बनली पहिली महिला पायलट

0
46

उत्तर प्रदेशातील शुभांगी स्वरूप या तरुणीने नुकताच नौदलातील पहिली महिला वैमानिक ठरण्याचा मान मिळवला. तर दिल्लीची आस्था सहगल, पुद्दुचेरीची रूपा ए. आणि केरळची शक्ती माया एस. या तिघी नौदलाच्या नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्टरेट विभागातील पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत.

# २०१५ मध्ये इंडियन नेव्ही ने महिला पायलट भरतीसाठी मंजुरी दिल्यानंतर शुभांगी पहिलीच महिला पायलट आहे. तिचे वडीलही नेव्हीमध्ये कमांडर आहेत.

# शुभांगी बरेलीची राहणारी असून ती पी आठ आय विमान चालविणार आहे. शुभांगी बरोबर आस्था सहगल, रूपा ए, शक्तीमाया एस या महिलांची आर्मामेंट इन्स्पेक्शन ब्रँचमध्ये प्रथमच निवड झाली आहे.

# केरळमधील एडिमला नेव्हल अॅकॅडमीमधून या चारही तरुण अधिकारी ‘नेव्हल ओरिएंटेशन कोर्स’ यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्या.

# आतापर्यंत नौदलाच्या एव्हिएशन विभागात महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता, मात्र त्यांची भूमिका एअर ट्रॅफिक कंट्रोलर किंवा विमानातील निरीक्षक एवढीच मर्यादित होती. त्यांच्यावर संदेशवहन आणि शस्त्रास्त्रे यांची जबाबदारी होती.

# शुभांगी स्वरूप हिच्या रूपाने नौदलात पहिलीच महिला वैमानिक दाखल झाली आहे. आता हैदराबाद येथील एअर फोर्स अॅकॅडमीमध्ये शुभांगी हिचे पुढील व्यावसायिक प्रशिक्षण पार पडेल.