शिवराज्याभिषेक दिवस जयंती – 6 जून 1674

0
31

6 जून इ.स. 1674 रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.

• छत्रपती शिवाजीराजे भोसले (19 फेब्रुवारी, 1630 ते 3 एप्रिल, 1680) हे इ.स. 1818 पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
• जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते.
• भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले.
• रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. 1674 मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.
• पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. 1630 मध्ये शिवाजी राजेंचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये शिवाजीची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला.
• महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 (शुक्रवार. 19 फेब्रुवारी, 1630) ही शिवरायांची जन्मतारीख 2001 साली स्वीकारली.
• त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी 19 फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते.

शिवराज्याभिषेक :

• छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती.
• राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला.
• शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते.
• सुमारे 11000 ब्राह्मण, यातील काही आपल्या कुटुंबीयांबरोबर, आले होते. इतर लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते.
• चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
• दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते.