शिन्जो आबे यांचा विजय

0
17

जपानमध्ये झालेल्या निवडणुकीत पंतप्रधान शिन्जो आबे यांनी दणदणीत विजय मिळवत देशातील राजकारणावर आपली पकड अधिक घट्ट केली.

# जपानमध्ये झालेल्या निवडणुकीत पंतप्रधान शिन्जो आबे यांनी रविवारी दणदणीत विजय मिळवत देशातील राजकारणावर आपली पकड अधिक घट्ट केली.

# या विजयामुळे उत्तर कोरियाबाबत त्यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेला तसेच जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यास आबे यांना बळ मिळाले आहे.

# आबे यांच्या लिबरल डेमॉक्रॅटिक पार्टीचा समावेश असलेली आघाडी जपानमधील ४६५ जागांपैकी ३११ जागांवर विजय मिळवण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. 

# या विजयामुळे आबे यांना जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवलेले नेते हा मान मिळाला आहे.

शिन्जो आबे

शिन्जो आबे हे जपान देशाचा नवनिर्वाचित पंतप्रधान व लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचा अध्यक्ष आहेत. ते ह्यापुर्वी सप्टेंबर २००६ ते सप्टेंबर २००७ दरम्यान जपानचा पंतप्रधान होते. डिसेंबर २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने सपशेल विजय मिळवला ज्यामुळे आबे यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपद मिळाले आहे.