शास्त्रज्ञ डेव्हिड गुडॉल यांचा देहत्याग

0
19

ऑस्ट्रेलियातील १०४ वर्षांचे शास्त्रज्ञ डेव्हिड गुडॉल यांनी गुरुवारी स्वित्झर्लंडमध्ये देहत्याग केला.जगण्याला आता कंटाळलोय, असे सांगत गुडॉल हे इच्छामरणासाठी ऑस्ट्रेलियाहून स्वित्झर्लंडमध्ये गेले होते. जगणे परिपूर्ण झाले, असे त्यांनी मृत्यूपूर्वी म्हटले होते.

भारतात स्वेच्छामरणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावरुन अजूनही वाद सुरु असतानाच स्वित्झर्लंडमध्ये शास्त्रज्ञ डेव्हिड गु़डॉल यांनी स्वेच्छामरणाचा निर्णय जाहीर केला होता. स्वेच्छामरणासाठीच ते ऑस्ट्रेलियावरुन स्वित्झर्लंडमध्ये आले. स्वित्झर्लंडमध्ये १९४०पासून वैद्यकीय साह्याने इच्छा मरणाचा अधिकार आहे.

 ही संस्था इच्छा मरणासाठी काम करते. गुडॉल यांच्या स्वेच्छामरणाच्या निर्णयानंतर याच संस्थेने त्यांना मदत केली. स्वेच्छामरणाची प्रक्रिया पूर्ण करताना गुडॉल थोडे कंटाळले होते. ही किती मोठी प्रक्रिया आहे, असे त्यांचे शब्द होते, असे फिलीप यांनी माध्यमांना सांगितले. गुडॉल यांनी मृत्यूपूर्वी शेवटच्या भोजनात मासे, चिप्स आणि चीझकेकचा आस्वाद घेतला. गुडॉल यांच्या इच्छेनुसार खोलीत बीथोवनची ‘नाइन्थ सिम्फनी’ लावण्यात आली होती.‘नाइन्थ सिम्फनी’ ही अखेरची सुरावट म्हणजे पाश्चात्य शास्त्रीय संगीतातील सर्वोच्च सांगीतिक कृती मानली जाते.

जगणे परिपूर्ण झाले असून आता मृत्यूसाठी हीच योग्य वेळ आहे, असे वाटल्यावर जीवनाचा निरोप घेण्याचा प्रत्येकाला अधिकार असला पाहिजे. मला जीवनाचा निरोप घेऊन मरणाचे स्वागत करण्याची संधी मिळाल्याचे समाधान आहे, असे शास्त्रज्ञ डेव्हिड गुडॉल यांनी अखेरच्या प्रवासाला निघताना पत्रकार परिषदेत शांतचित्ताने सांगितले.माझ्या मायदेशी म्हणजे ऑस्ट्रेलियातच मला मृत्यूचा असा कायदेशीर स्वीकार करता आला असता, तर आनंद वाटला असता. पण इतर अनेक देशांप्रमाणेच ऑस्ट्रेलियातही मरणाचा स्वीकार हा गुन्हा मानला जातो. त्यामुळे मला स्वित्झर्लंडला यावे लागले, असे त्यांनी सांगितले.जगण्याची उमेद आणि दर्जा पूर्वीसारखा उरलेला नाही. गेल्या सहा वर्षांपासून कमी दिसू लागले आहे. शारीरिक शक्तीही गेल्या एक-दोन वर्षांत घटली आहे. त्यामुळे अंताचा स्वीकार करण्याच्या निर्णयाप्रत आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. माझ्या या स्वनिर्णीत मृत्यूने जगभर नव्या चर्चेला सुरुवात होईल आणि त्यातून अनेक देश आपल्या कायद्यात दुरुस्ती करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती.