व्हीव्हीपॅट यंत्रांमध्ये निवडणूक आयोगाने केले बदल

0
38

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील मतदानाचा पुरावा म्हणून वापरण्यात येणाऱ्या व्हीव्हीपॅट यंत्रांमध्ये निवडणूक आयोगाने काही बदल केले आहेत. कठीण हवामानात या यंत्रांमध्ये बिघाड होऊ नये, यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.

या बदलांमध्ये मुख्यतः कॉन्ट्रास्ट सेन्सरच्या वर एक छोटेसे झाकण लावणे तसेच ओलावा शोषून न घेणाऱ्या कागदाचे रोल वापरणे यांचा समावेश आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी ही माहिती दिली. कैराना आणि भंडारा व गोंदिया सहित चार लोकसभा मतदारसंघ आणि 10 विधानसभा मतदारसंघांमध्ये अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुकांत व्हीव्हीपॅटचा वापर झाला होता. मात्र त्यात मोठ्या प्रमाणावर तक्रारी आढळल्या होत्या. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ञ समितीने मूळ कारणांचे विश्लेषण करून हे बदल केले.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे त्यामुळे त्याला उष्णता आणि ओलाव्यामुळे काही समस्या येत नाही. परंतु पेपर ट्रेल मशिनचे सुटे भाग इलेक्ट्रो-मेकॅनिकल असतात त्यामुळे त्यांचे कार्य हवामानाने प्रभावित होते.