वीरधवलला सुवर्णपदक

0
18

भोपाळ येथील वरिष्ठ गट राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या वीरधवल खाडे याने सुवर्णपदक पटकाविले. त्याने ५० मीटर फ्री स्टाईल प्रकारात यश मिळविले.

क्रीडानगरी कोल्हापूरचा गोल्डनबॉय असा नावलौकिक असणार्‍या वीरधवल खाडे याने आपल्या कारकिर्दीस साजेशी कामगिरी करत भोपाळ येथे सुरू असणार्‍या वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. या पदकाबरोबरच आजपर्यंतच्या त्याच्या अवघ्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत १५७ राष्ट्रीय पदकांची नोंद त्याच्या नावावर झाली आहे. 

गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर पुढील वर्षी होणार्‍या एशियन व कॉमनवेल्थ गेम्सची तयारी म्हणून वीरधवल या स्पर्धेत उतरला आहे. अवघ्या सहा महिन्यांच्या सरावानंतर वीरधवलने ५० मीटर फ्री स्टाईल प्रकारात २३.१ इतकी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. अन्शुल कोठारीने २३.३ इतकी वेळ नोंदवत रौप्य, तर अरोन डिसुझाने २३.६ इतकी वेळ नोंदवत कांस्यपदक मिळविले. मंगळवारी वीरधवल ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात सहभागी होणार आहे.

वीरधवल हा मालवण येथे तहसीलदार असून, सध्या बंगळूर येथे प्रशिक्षक निहार अमीन यांच्याकडे सराव करत आहे. त्याने २०१८ ला होत असलेल्या एशियन व कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. दोन वर्षांनंतर स्पर्धेत उतरून त्याने सुवर्णपदकाची कमाई केली.