विश्वचषक 2019 – भारत विरुद्ध पाकिस्तान सामना – भारताने पाकिस्तानला 89 धावांनी हरविले (डीएलएस पद्धत)

0
21

16 जून, 2019 रोजी ओल्ड ट्रॅफोर्ड, मँचेस्टर येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताने DLS पद्धतीने पाकिस्तानवर 89 धावांनी विजय मिळविला.

• डीएलएस पद्धतीनुसार पाकिस्तानला 40 षटकात 302 धावा करण्याचे लक्ष देण्यात आले जे त्यांच्या साठी अशक्यच होते.
• सामन्यादरम्यानच पाउस आल्यामुळे पाकिस्तानचे लक्ष DLS पद्धतीने बदलण्यात आले होते. कारण 35 षटके खेळल्यानंतर सुद्धा पाकिस्तानने केवळ 166 धावा केल्या होत्या.
• पावसाच्या व्यत्ययामुळे व्यत्यय आला तरी भारताने 50 षटकांत 336/5 अशी आघाडी घेतली होती. पाकिस्तानने 337 धावांचा पाठलाग केला.
• कालच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी विशेष म्हणजे रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनी शानदार प्रदर्शन केले. शर्माने 113 चेंडूंत 140 धावा केल्या, जी चालू क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील त्याची दुसरी शतक आहे.
• त्यापूर्वी भारताने नाणेफेक गमावले होते आणि त्यांना प्रथम फलंदाजी करायची होती.
• कालच्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी बरोबरच रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग 5 डावांत 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या. या आधी मास्टर ब्लास्टर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या खेळाडूंनी हा पराक्रम केला आहे. या खेळाडूंच्या पंगतीत आता रोहित शर्मालाही स्थान मिळाले आहे.

• एकदिवसीय कारकिर्दीत सलग पाच वेळा 50+ धावा करणारे :
– सचिन तेंडुलकर (नोव्हेंबर 1994)
– विराट कोहली (फेब्रुवारी-जुलै 2012)
– विराट कोहली (जुलै-ऑक्टोबर 2013)
– अजिंक्य रहाणे (सप्टेंबर 2017-फेब्रुवारी 2018)
– रोहित शर्मा (मार्च-जून 2019)

• याशिवाय, रोहित शर्मा विश्वचषक स्पर्धेत सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही पाचव्या क्रमांकावर पोहोचला. या यादीमध्ये विरेंद्र सेहवाग 81 चेंडूत झळकावलेल्या शतकासह पहिल्या स्थानावर आहे.
• यासोबत विराट कोहलीने ही 11000 धावा पूर्ण करून विक्रम नोंदविला. विराट कोहलीने आतापर्यंत 11000 एकदिवसीय धावा खेळण्याची सर्वात वेगवान कामगिरी केली आहे. त्याने केवळ 222 डावात हे विक्रम केले. हा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरने जवळपास 17 वर्षांपर्यंत ठेवला होता.