विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 6 गडी राखून पराभूत केले

0
45

भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने 2019 विश्वचषक स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात अनोखा विक्रम करत, मानाच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. आफ्रिकेने दिलेल्या 228 धावांचा पाठलाग करताना सुरुवातीलाच सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली लवकर परत गेले. मात्र रोहित शर्माने एका बाजूने संयमी खेळ दाखवत बाजू सांभाळली.

• रोहितने तिसऱ्या विकेटसाठी लोकेश राहुलसोबत महत्वाची भागीदारी रचत भारताला 100 धावा केल्या.
• यासोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितने 12 हजार धावांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा रोहित नववा भारतीय खेळाडू ठरला आहे.
• याआधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली, सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी, विरेंद्र सेहवाग, मोहम्मद अझरुद्दीन आणि सुनिल गावसकर यांनी हा पल्ला गाठला आहे. आता या यादीमध्ये रोहितचं नाव सामील झाले आहे.
• याआधी, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराहच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर, पहिला विश्वचषक सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला 227 धावांवर सीमित ठेवले. हा सामना जिंकण्यासाठी भारताला 228 धावांची आवश्यकता होती. सलामीच्या फळीतील फलंदाजांचं अपयश हे आफ्रिकन संघाच्या खराब कामगिरीचं कारण ठरलं. आफ्रिकेकडून मधल्या फळीत ख्रिस मॉरिसने आश्वासक फलंदाजी केली.
• नाणेफेक जिंकून आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याचा हा निर्णय अपेक्षेप्रमाणे उपयोगी ठरला नाही.
• जसप्रीत बुमराहने हाशिम आमला आणि क्विंटन डी-कॉक यांना माघारी धाडत आफ्रिकेला बॅकफूटला ढकललं. यानंतर कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि वॅन डर डसन यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मात्र चहलने डसन आणि डु प्लेसिस यांना ठराविक अंतराने माघारी धाडत भारताची बाजू परत मजबूत केली.
• मधल्या फळीत भरवशाचा जे पी ड्युमिनीही काही प्रभावी खेळ दाखवू शकला नाही. तो कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला.
• यानंतर फेलुक्वायो आणि ख्रिस मॉरिस यांनी सातव्या विकेटसाठी भागीदारी करत संघाला 200 धावांचा टप्पा गाठून दिला.
• भारताकडून युजवेंद्र चहलने 4 बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी 2-2 तर कुलदीप यादवने 1 बळी घेतला.
• जवाबी पारीत भारताच्या बाजूने रोहित शर्मा ने नाबाद सर्वाधिक 122 धावा, महेंद्रसिंग धोनीने 34 तर के एल राहुलने 26 धावा केल्या.
• रोहित शर्माला सामनावीर देण्यात आले.